Old Hospicio Building Salcete | जुन्या 'हाँस्पिसिओ' रुग्णालयाच्या मालमत्तेचा वापर समाजहितासाठी करण्याची नागरिकांची मागणी

Old Hospicio Building Salcete | आरोग्य सेवा संचालकांच्या अर्जानंतर भूमी सर्वेक्षण विभागाने जुन्या 'हाँस्पिसिओ' रुग्णालयाच्या मालमत्तेची अधिकृत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Old Hospicio Building Salcete
Old Hospicio Building Salcete
Published on: 
Updated on: 

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
आरोग्य सेवा संचालकांच्या अर्जानंतर भूमी सर्वेक्षण विभागाने जुन्या 'हाँस्पिसिओ' रुग्णालयाच्या मालमत्तेची अधिकृत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थापक फादर मिरांडा यांचा वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

Old Hospicio Building Salcete
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

या मालमत्तेवर कोणताही व्यावसायिक प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शवत, तिचा वापर गरजू आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठीच करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फादर मिरांडा यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने 'हाँस्पिसिओ'ची स्थापना केली, तो उद्देश कायम ठेवावा.

परिसरातील दोन चॅपेल आणि कॉन्व्हेंटचा भाग देखभालसाठी चर्चकडे सोपवावा, अशी भूमिका नागरिकांनी मांडली. आरोग्य सेवा संचालनालयाने या मालमत्तेच्या अधिकृत नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

सध्या 'फॉर्म बी'मध्ये 'हाँस्पिसिओ'चा उल्लेख असून, हा तात्पुरता मालमत्ता अभिलेख आहे. चौकशी अधिकारी संबंधित कागदपत्ररांची तपासणी करून चौकशी करतील आणि त्यानंतर योग्य आदेश देतील, असे एका क्षेत्रीय अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले.

मालमत्तेची मोजणी आणि ताब्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरळ अहवाल 'इन्स्पेक्टर ऑफ सेटलमेंट अँड लँड रेकॉर्ड्स' यांच्याकडे सादर केला जाईल. ते या प्रकरणातील चौकशी अधिकारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Old Hospicio Building Salcete
Cyber Fraud Case Goa | नुवे येथील युवकाला 1.85 लाखाला ऑनलाईन गंडा

'होली स्पिरिट चर्च'चे पॅरिश प्रिएस्ट डॉमिंगोस नरोना यांनी सांगितले की, फादर मिरांडा यांचे योगदान आणि त्यांचा वारसा जपण्याची विनंती सरकारकडे करण्यासाठी नागरिक या इमारतीजवळ एकत्र आले होते.

'हाँस्पिसिओ'च्या आवारातील चॅपेलमध्ये प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. फादर मिरांडा यांनी गरिबांना आणि गरजूना मदत करण्याचा वारसा जपला. सरकारनेही त्याचे संरक्षण करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news