हळदोणा येथील धोकादायक बाजार संकुलाची इमारत पाडणार

बार्देशच्या उपजिल्हाधिकार्‍यांची मंजुरी
market complex building at Haldona
हळदोणा येथील धोकादायक बाजार संकुलाची इमारत पाडण्यास परवानगी मिळाली आहे.Pudhari News Network

पणजी : पुढारी वृत्तसेवा : उत्तर गोवा जिल्ह्यातील हळदोणा येथील धोकादायक झालेल्या बाजार संकुलाची इमारत पाडण्यास बार्देशच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. हळदोणा येथील बाजार संकुल इमारत जुनी असून ती धोकादायक बनली होती. त्यामुळे ही इमारत पाडून तिथे नवीन इमारत उभारण्याची मागणी स्थानिकांमधून होत होती.

market complex building at Haldona
गोवा : 1 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; रशियन तरुणाला अटक

हळदोणे आमदार कार्लुस फेरेरा यांनीही या धोकादायक इमारतीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. ही इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असून येथे नवीन इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news