Goa Soham Naik Case | आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक; लैंगिक अत्याचार अन् व्हिडीओ शूट

Goa Soham Naik Case | संशयित सोहम नाईक याची 'मोडस ऑपरेंडी'
आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक; लैंगिक अत्याचार अन् व्हिडीओ शूट
आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक; लैंगिक अत्याचार अन् व्हिडीओ शूटPudhari File Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलींशी आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक करून जवळीक साधणे, वेगवेगळ्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर व्हिडीओ शूट करणे, ही सोहम नाईकची मोडस ऑपरेंडी असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक; लैंगिक अत्याचार अन् व्हिडीओ शूट
Goa Sexual Scandal| गोव्यात 'रेवण्णा-2' तयार झालाय का? कुडचडे प्रकरणावरून काँग्रेसचा भाजप सरकारवर घणाघाती वार

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक पीडिता समोर आली आहे. कुडचडे येथील लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी आणखी तीन मुलींच्या जबान्या नोंदवण्यासाठी तपास अधिकारी प्रयत्नशील असून, तक्रार करणाऱ्या पीडितांची संख्या आता ५ झाली आहे.

सोहम नाईकच्या मित्रांचे दणाणले धाबे

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अजून एक पीडिता समोर आली असून आणखी काही पीडिता न्यायासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास सुरू आहे. तपासात जशी माहिती पुढे येईल, त्यावरून आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊनच तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे, जेणेकरून सखोल चौकशी होईल आणि पीडितांची ओळखही गुप्त राहील, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.

दरम्यान, डीजीपी यांच्या माहितीनंतर संशयित सोहम याच्या मित्रांचे धाबे दणाणले आहेत. कुडचडे लैगिंक अत्याचाराला दै. 'पुढारी'ने वाचा फोडल्यानंतर स्थानिकांनी आक्रमक होत पोलिस निरीक्षकांना घेराव घातला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित सोहम सुशांत नाईक या नगरसेवक पुत्राला अटक केली होती.

आधी मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक; लैंगिक अत्याचार अन् व्हिडीओ शूट
Sex Scandal Case | विकृतीचा कळस! अश्लील व्हिडीओ दाखवून मारली बढाई; कुडचडे सेक्स स्कँडलचा असा झाला उलगडा

त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून आतापर्यंत ४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. संशयिताला न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, क्राईम ब्रँच याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

क्राईम ब्रँचचे दोन स्वतंत्र पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांच्या जवान्या नोंदवून घेण्यासोबत आणखी पीडित मुलींचा शोध घेतला जात आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यावर तपास अधिकाऱ्यांचा भर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news