holiday package fraud couple cheated |हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली दाम्पत्याची ९९,४३० रु.ची फसवणूक

हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली दाम्पत्याची ९९,४३० रु.ची फसवणूक
  fraud case
fraud case(File Photo)
Published on: 
Updated on: 

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली रामनगर (कर्नाटक) येथील एका पर्यटक दाम्पत्याची ९९ हजार ४३० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी जीओआयआय व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक गौरेश रत्नाकर शिरोडकर (रा. डोंगरी, मांडूर तिसवाडी) याला अटक केली. तर, कंपनीचा प्रतिनिधी बदरूद्दीन कमल खान आणि एक अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

हा फसवणुकीचा प्रकार ७ सप्टेंबर रोजी हडफडे येथे घडला होता. याप्रकरणी पर्यटक निदा कनीस फातिमा (रा. रामनगर, कर्नाटक) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी संशयितांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार निदा पती मोहम्मद कौसेर यांच्यासोबत गोव्यात पर्यटनासाठी आल्या असता त्यांची फसवणूक झाली होती. आरोपी जीओआयआय व्हॅकेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता.

  fraud case
Goa Cabinet Expansion | अखेर संकल्प आमोणकर यांचा गोवा मंत्रिमंडळात बारावे मंत्री म्हणून समावेश

या कंपनीद्वारे कर्मचारी विविध मार्गानी, स्क्रॅच कार्ड वाटून, संभाव्य ग्राहकांना आकर्षित करत असत. त्यानंतर, ग्राहकांना हडफडे येथील हॉटेल लेमन ट्रीमध्ये नेले जात असे, जिथे कंपनीचे इतर कर्मचारी त्यांना विविध हॉलिडे पॅकेजबद्दल माहिती देऊन पैसे भरण्यास प्रवृत्त करत असत. प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादीचीही अशाचप्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. संशयित आरोपी गौरेश शिरोडकर याला म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  fraud case
Pramod Sawant| गोवा राज्यात लवकरच पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.