Colvale Jail | कोलवाळ कारागृह गांजा तस्करी प्रकरणी कैदी योगेश मांंद्रेकरला पोलिसांकडून अटक

Colvale Jail | कथित अमलीपदार्थ तस्करीत नेटवर्कचा तपास विस्तारला
Jail
JailPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ कारागृहातील गांजा तस्करीप्रकरणाचा तपास अधिक व्यापक व विस्तारित करून बलात्काराच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या कैदी योगेश मांद्रेकर याला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

Jail
Mumbai Goa Highway: गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पुर्ण करा, शिवसेनेची मागणी

कारागृह कर्मचारी व कैदी यांच्यातील ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश या प्रकरणांनंतर उजेडात आला आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून कथितरीत्या चालवण्यात येत असलेल्या अमलीपदार्थ तस्करांच्या नेटवर्कमध्ये कैदी तसेच कारागृहाबाहेरील संभाव्य साथीदारांचा सहभाग असल्याचा व त्यांच्यामधील दुवा हे कारागृह कर्मचारी असल्याचे तपासात आढळून आले आहे.या ड्रग्ज तस्करीप्रकरणात ड्रग्ज कारागृहात आणण्याच्या कामात कारागृह कर्मचारी आहेत त्यामुळे काही संशयास्पद कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे.

Jail
Goa News | दक्षिण गोवा बालकल्याण समितीतील तीन सदस्यांचे निलंबन; सचिवांकडे धाव घेत कारवाईला आव्हान!

पोलिसांकडून या प्रकरणात कथितपणे वापरण्यात आलेले मोबाईल फोन, आर्थिक व्यवहार, पैशांची देवाणघेवाण तसेच कारागृहाबाहेरील व्यक्तींशी असलेले संभाव्य संबंध यांची माहिती गोळा केली जात आहे. या माध्यमातून कारागृहातून अमली पदार्थांचे नेटवर्क कशा पद्धतीने चालवले जात होते आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

सध्या संशयित सुरक्षा कर्मचारी आशा चोडणकर हिची जामिनावर सुटका झाली आहे तर खून प्रकरणातील संशयित रोविना लोबो ही न्यायालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणाचा उलगडा एका महिला सुरक्षा रक्षकाच्या अटकेनंतर झाला. अमली तिच्या चौकशीतून तपासाची दिशा कारागृहातील कैद्यांकडे वळली. त्यानंतर रोविना लोबो या महिला कैदीला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news