CM Pramod Sawant | प्रजनन काळात मादी खेकड्यांची शिकार थांबवा! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मच्छीमारांना आवाहन

CM Pramod Sawant | एका मादी खेकड्यात ८ लाख अंडी! अंडीयुक्त खेकड्यांच्या शिकारीमुळे गोव्यात स्थानिक खेकडे नामशेष होण्याचा धोका
Chief Minister Dr. Pramod Sawant
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
प्रजनन काळात मादी खेकड्यांची शिकार थांबवून सागरी संपदेचे रक्षण करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा राज्याची ओळख केवळ निसर्गरम्य किनाऱ्यांपुरती मर्यादित नसून, येथील समृद्ध सागरी जैवविविधता आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती हेदेखील गोव्याच्या अस्मितेचा भाग आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

मात्र, बदलत्या पर्यावरणासोबतच प्रजननाच्या काळात होणाऱ्या अनियंत्रित मासेमारीमुळे राज्यातील सागरी परिसंस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मच्छीमार पेले यांच्याशी संवाद साधून या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. सागरी जीवसृष्टीचा समतोल राखण्यात खेकड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पावसाळ्याच्या दिवसांत मिळणाऱ्या एका मादी खेकड्याच्या पोटात सुमारे आठ लाख अंडी असतात.

प्रजननासाठी तयार असलेल्या या अंडीयुक्त मादी खेकड्यांची शिकार केली गेल्यास लाखो नवीन खेकड्यांची निर्मिती प्रक्रिया जागीच थांबते. त्यामुळे समुद्रातील व खाडीतील खेकड्यांची संख्या वेगाने घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

जर अशाच प्रकारे अंडी असलेल्या मादी खेकड्यांची शिकार सुरू राहिली, तर येत्या दहा वर्षांत गोव्यात स्थानिक खेकडे मिळणे कठीण होईल आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये मिळणाऱ्या पारंपरिक गोवन खाद्यपदार्थांवर याचा थेट परिणाम होईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Viresh Borkar Revolutionary Goans | वीरेश बोरकरांकडून पणजी कार्यालय ताबा; वाद चिघळण्याची शक्यता

मच्छीमारांनी जाळ्यात सापडलेले अंडीधारक मादी खेकडे मारण्याऐवजी त्यांना पुन्हा सोडून दिले पाहिजे तसेच आवश्यकता भासल्यास मत्स्यव्यवसाय खात्याकडे सुपूर्द करून संवर्धननाला चालना द्यावी.

जनजागृती करू : पेले
मुख्यमंत्री सावंत यांच्या या आवाहनाला मच्छीमार पेले यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, गोव्यातील पारंपरिक मच्छीमार बांधवांमध्ये याविषयी व्यापक जनजागृती करण्याचे आश्वासन दिले आहे. निसर्गाचा हा अनमोल वारसा आणि सागरी संपदा भावी पिढीसाठी सुरक्षित ठेवणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची व मच्छीमार बांधवाची एकत्रित जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news