Goa Students | गोव्याच्या चिमुरड्यांची रोबोटिक्समध्ये जागतिक भरारी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार

Goa Students | रोबोटिक्स व स्टेम क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकार स्टेम शिक्षण व नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स आणि स्टेम स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

CM Pramod Sawant
Health Minister Vishwajit Rane | नैराश्याबद्दल जागरूकतेसाठी राज्यातील 94 गावांमध्ये समुपदेशन

वर्ल्ड स्टेम अँड रोबोटिक्स ऑलिम्पियाड, व्हीइएम रोबोटिक्स आणि फर्स्ट टेक चॅलेंज यांसारख्या स्पर्धांमध्ये राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी 'क्युरियस माइंड इन्फोटेनमेंट प्रा. लि.' या संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना शिक्षण विभाग, शाळा, शिक्षक व पालकांच्या सहकार्याचीही दखल घेतली.

रोबोटिक्स ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल, डिगस पंचवाडीच्या विद्यार्थ्यांनी 'इंडस्ट्री ४.०' विभागात सहभाग नोंदविला. प्रज्ञा हायस्कूल, सेंट बार्थोलोम्यूज हायस्कूल व सरस्वत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांत पारितोषिके मिळविली.

CM Pramod Sawant
Margao Carnival Parade 2026 | मडगावात 15 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्हलचा उत्साह; सायंकाळी 4 वाजता परेडला होणार सुरुवात

एरियाना बनली यंग सायंटिस्ट

वर्ल्ड स्टेम अँड रोबोटिक्स ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धेत शारदा मंदिरच्या रोनव व एरियाना चोडणकर यांना 'यंग सायंटिस्ट' पुरस्कार, तर श्लोक जुवाटकर यांना 'ज्युनियर रोबो रेस'मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी व्हीइएम रोबोटिक्स आणि फर्स्ट टेक चॅलेंज स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news