CM Pramod Sawant | मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीची माहिती आता 15424 क्रमांकावर उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आरोग्यासह उपचाराबाबतही मिळणार मार्गदर्शन
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीची माहिती १५४२४ या क्रमांकावर उपलब्ध होणार असून, रुग्णांना आरोग्य आणि उपचाराबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे. सध्या ही सेवा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध असून, लवकरच ती २४ तास सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

या योजनेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत आर्थिक मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दोनापावला येथील एका खासगी इस्पितळात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी योजनेअंतर्गत एका रुग्णाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केल्यानंतर ते बोलत होते.

या योजनेअंतर्गत उपचारांच्या खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. दुर्दैवी आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मदत मिळावी, यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये मेडिक्लेम आणि दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजना ( डीडीएसएसवाय) यांचा समावेश आहे.

डीडीएसएसवाय योजना सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, मेडिक्लेम योजनेतील सोपस्कर किचकट आहेत. उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यास दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेसोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीही रुग्णांच्या उपयोगी ठरेल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

...तर योजना अधिक लाभदायी ठरेल

या योजनेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. कॉर्पोरेट कंपन्यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत योगदान दिल्यास ही योजना अधिक लाभदायी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. १५४२४ क्रमांकावर सध्या योजनेची माहिती मिळते. लवकरच ही सेवा चोवीस तास सुरू करून, योजनेच्या माहितीसोबत आरोग्य आणि उपचाराबाबतही रुग्णांना मार्गदर्शन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news