

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हणजूण येथील कृषी जमीन - बेकायदेशीररीत्या गैर-कृषी - वापरासाठी रूपांतरित केल्याप्रकरणी - बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी नाईट क्लब गोयाला १५ लाखांचा दंड ठोठावला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या - आदेशानुसार संबंधित जमीन ३० दिवसांच्या आत मूळ कृषी स्वरुपात - पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबच्या भीषण आगीच्या प्रकरणानंतर सरकारने किनारपट्टी परिसरातील नाईट क्लब तसेच बार व रेस्टॉरंटस्ची तपासणी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेवेळी क्लब गोयाची कागदपत्रे प्राथमिकरीत्या तपासण्यात आली, तेव्हा हा क्लब शेतजमिनीवर बांधण्यात आल्याचे उघडकीस मालकाकडे अग्निशमन तसेच आले.
क्लबच्या आपत्कालीन सेवा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नव्हते. त्यामुळे या क्लबला सील ठोकून त्याची चौकशी सुरू होती. तपासात सदर जमीन कायदेशीर परवानगीशिवाय सुमारे २५०० गैर-कृषी वापरासाठी रूपांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जमीन वापर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल क्लब गोयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या कालावधीत क्लबने जमीन पूर्ववत न केल्यास बार्देश मामलेदार कार्यालयामार्फत प्रशासन स्वतः जमिनीच्या पुनर्संचयितीकरणासाठी कारवाई करील.
या कारवाईमुळे गोव्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि जमीन रूपांतर प्रकरणांवर प्रशासनाची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पर्यावरण संरक्षण आणि कृषी जमिनींचे संवर्धन यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.