Goa Highway Accident: करासवाडा जंक्शनजवळ कदंब बस, कार अन् पिकअप एकमेकांवर धडकले!

Goa Highway Accident: म्हापसा-करासवाडा येथे साखळी अपघात! चार वाहनांचे मोठे नुकसान, पादचाऱ्याचा निष्काळजीपणा भोवला
Goa Highway Accident
Goa Highway Accident
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

रस्ता ओलांडताना पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात मंगळवारी सकाळी म्हापसा करासवाडा जंक्शन जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला.

Goa Highway Accident
Goa Opposition Rift Vijay Sardesai | विरोधात पुन्हा विसंवाद! विजय सरदेसाईंना निमंत्रणच नाही, गोवा फॉरवर्ड अध्यक्षांची तीव्र नाराजी

महामार्गावर सकाळच्या वेळेस वाहनांची वर्दळ असते. एक पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आला. त्याला धडक बसू नये याकरिता येणाऱ्या वाहनाने क्षणाधार्त ब्रेक मारला. मात्र मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कदंबा बस, कार आणि पिकअप वाहनांच्या चालकांना वाहनांवरील नियंत्रण राखता आले नाही.

त्यामुळे बस, कार व पिकअप वाहने एकमेकांवर आदळून साखळी अपघात झाला. या अपघाताचा आवाज मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील नागरिकांनी इतर वाहन चालक तातडीने घटनास्थळी धावले.

Goa Highway Accident
Inland Water Sports Ban | अंतर्गत जलक्रीडांना हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाकडून ब्रेक; तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश

कारच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून या जोरदार धडकेमुळे कार मधील एअरबॅग्जही उघडल्या. तसेच पिकअप वाहन आणि कदंब बसच्या भागाचेही मोठे नुकसान झाले.

या विचित्र अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक पूर्ववत केली. पादचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असले तरी या प्रकरणी म्हापसा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news