Navratri Traditions Goa | मडगावातील घराण्यांमध्ये शेकडो वर्षांची नवरात्र परंपरा; आळवी, कुरतरकर अन् म्हापसेकर कुटुंबांत भक्तीचा जागर

Navratri Traditions Goa | आळवी, कुरतरकर, म्हापसेकर कुटुंबांत कुलदेवतेची पूजा, विविध धार्मिक विधी
Navratri Traditions Goa
Navratri Traditions Goa
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

शक्तीची आराधना आणि भक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाचे मडगावात पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. मंदिरांप्रमाणेच शहरातील अनेक घराण्यांमध्ये शेकडो वर्षांपासून घटस्थापना आणि देवीपूजेची परंपरा श्रद्धेने जपली जात आहे. कॉम्बो येथील आळवी, कुरतरकर आणि म्हापसेकर घराण्यांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, प्रसाद आणि कुलदेवतेच्या पूजेचे आयोजन केले जाते. पूर्वजांकडून चालत आलेल्या या परंपरांमधून धार्मिक श्रद्धेसोबत सांस्कृतिक वारशाचेही जतन होत आहे.

Navratri Traditions Goa
Goa Margao Street Vendor Issue | मडगाव येथील फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळला

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. राज्यात मडकई येथील नवदुर्गा, फातर्पे येथील शांतादुर्गा, शिरगावची लईराई, गुडी-पारोडा येथील शांतादुर्गा चामुंडेश्वरी, बांदोड्याची महालक्ष्मी आणि मढोळची म्हाळसा नारायणी या मंदिरांत मखरोत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी नऊ दिवस देवीपूजा, हवन, जागर आणि गरबा आयोजित केला जातो.

काही मंदिरांत घटस्थापनेनंतर धान्य रुजवले जाते. नवव्या दिवशी हे धान्य सोने म्हणून वाटले जाते. कुरतरकर घराण्याची कुलदेवता घुडे-अवेडे येथील श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी आहे. पूर्वज विष्णुशेट रायु कुरतरकर यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीची घरात स्थापना केली. मंदिरातील धार्मिक परंपरेनुसारच या घरात देवकार्य केले जाते.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी तांदूळ, डाळ आणि गूळ यांची गोड खिचडी प्रसाद म्हणून अर्पण केली जाते. दररोज फुले, रानफुले आणि तुळशीची पाने गुंफलेल्या सुमारे एक मीटर लांबीच्या दोन माळा देवीला अर्पण केल्या जातात. त्यानंतर सुक्या पोह्यांचा प्रसाद १३ वाट्यांमध्ये वाढला जातो.

कुरतरकर घराण्यात नवमीला कुमारिकापूजन:

नवमीला कुरतरकर यांच्या घरी एका कुमारिकेसह दोन सुवासिनी, एक ब्राह्मण आणि एका कुमाराला आमंत्रित केले जाते. कुमारिकेला देवीचे रूप मानून तिचा शृंगार केला जातो. तिचे पाय धुऊन पूजा केल्यानंतर तिला भोजन दिले जाते. तिच्या ताटात नऊ पुऱ्या वाढण्याची विशेष प्रथा असल्याची माहिती कुरतरकर कुटुंबीयांनी दिली.

Navratri Traditions Goa
FDA Raid Meat Seizure | मडगाव रेल्वे स्थानकाबाहेर एफडीएचा मोठा छापा;1.84 लाखांचे 408 किलो बेकायदेशीर मांस जप्त

आळवी, म्हापसेकर घराण्यांतही विशेष विधी:

कॉम्बो येथील आळवी घराण्याचे कुलदैवत वन्हाडचे श्री वेतोबा आहे. घटस्थापनेपासून देवीला दररोज वाढत्या क्रमाने माळा अर्पण केल्या जातात. पूर्वी दररोज कुमारिकापूजन केले जात असे. आता नवमीला कुमारिका, कुमार, ब्राह्मण आणि सुहासिनींना आमंत्रित करून भोजन दिले जाते.

पाच मोठ्या वड्यांचा प्रसादही दिला जातो. म्हापसेकर घराण्याची कुलदेवता धारबांदोडा येथील शांतादुर्गा आहे. या घराण्यातही दररोज वाढत्या क्रमाने माळा अर्पण करून गोड खिचडीचा प्रसाद दिला जातो. नवमीला कुमारिकापूजनासह कुमार, ब्राह्मण आणि सुहासिनींना भोजन, वस्त्रे व फळे देऊन सन्मानित केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news