FDA Raid Meat Seizure | मडगाव रेल्वे स्थानकाबाहेर एफडीएचा मोठा छापा;1.84 लाखांचे 408 किलो बेकायदेशीर मांस जप्त

FDA Raid Meat Seizure | मडगाव रेल्वे स्थानक परिसरात एफडीएची धडक कारवाई
FDA Raid Meat Seizure
FDA Raid Meat Seizure
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केलेले तब्बल ४०८ किलो मांस ताब्यात घेतले. या मांसाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८३ हजार ६०० रुपये असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

FDA Raid Meat Seizure
Vijai Sardesai | पितृपक्षानंतर गोवा फॉरवर्ड, काँग्रेस युतीची बोलणी

या कारवाईदरम्यान एका ओम्नी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ५८ किलो मांस आढळून आले. दिल्लीहून रेल्वेमार्गे हे मांस मडगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते. तेथून मडगावमधील किरकोळ विक्रेत्यांना वितरण करण्यात येणार होते. या मांसाची किंमत सुमारे २६ हजार १०० रुपये आहे.

तसेच, दुसऱ्या महिंद्रा कॅरियर वाहनातून पाच बॉक्समध्ये ३५० किलो मांस आढळले. या साठ्याची अंदाजे किंमत १ लाख ५७ हजार ५०० रुपये आहे. तपासणीमध्ये या मांसाच्या साठ्यावर अनिवार्य लेबल घोषणा नसणे, खरेदीचे बिल नसणे, आवश्यक पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, तसेच एफएसएसएच्या नियमांनुसार मांसाची वाहतूक व साठवणूक न केल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news