Captain of Ports Panjim | 'बंदर कप्तान'च्या नव्या इमारतीचे खासगीकरण

Captain of Ports Panjim | 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो'चा न्यायालयात जाण्याचा इशारा
Captain of Ports Panjim
Captain of Ports Panjim
Published on: 
Updated on: 

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीच्या तीरावर बांधलेले जहाजाच्या आकाराचे कॅप्टन ऑफ पोर्टस् टर्मिनल आणि त्याच्याशी संबंधित जेटी सुविधा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासााठी कॅप्टन ऑफ पोर्टसने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्तावाची मागणी केली आहे. ही इमारत कॅसिनो लॉबीला देण्याचा मनसुबा असल्याचा आरोप 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो' या संघटनेने केला आहे. या संघटनेने याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Captain of Ports Panjim
Porvorim Crime News| पर्वरी गोळीबार प्रकरणी संशयित सतीश शिंदेला म्हापसा न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी

नवीन प्रस्तावानुसार, खासगी ऑपरेटर पणजी, जुने गोवा आणि बेती येथील सहा जेटींची व्यवस्था आपल्या हातात घेईल. याशिवाय कला अकादमी, महावीर गार्डन आणि परशुराम पुतळ्याजवळील तीन नवीन तरंगत्या जेटीसुद्धा या प्रकल्पात जोडल्या आहेत. दिवजा सर्कलाजवळ एक नवीन तरंगती काँक्रीट जेटी, छोटे टर्मिनल आणि 'यॉट'साठी डॉकिंग स्टेशन बांधण्याची योजना आहे.

ही टर्मिनल इमारत खासगी संस्थेला देण्याबाबत 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो' या संघटनेने तीव्र आक्षेप नोंद केला आहे. जर ही निविदा तीन दिवसांच्या आत रद्द केली नाही, तर न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो'चे वाल्मिकी नाईक यांनी दिला आहे.

Captain of Ports Panjim
Goa Luthra brothers surrender|लुथरा बंधू, अजय गुप्ता व तरुण तेजपाल म्हापसा न्यायालयात शरण, कोलवाळ कारागृहात रवानगी

खासगीकरणाचा प्रस्ताव नाही

दरम्यान, बंदर कप्तान खात्याने बंदर कप्तान टर्मिनल इमारत आणि संलग्न जेट्टी सुविधांच्या संचालन व देखभालीसाठी नुकत्याच काढलेल्या निविदेबाबत प्रसिद्ध झालेल्या दिशाभूल करणाऱ्या वृत्तांवर आणि उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवर स्पष्टीकरण दिले आहे. कॅप्टन ऑफ पोर्टसने सरकारकडून टर्मिनल इमारत किंवा जेट्टींचे 'खासगीकरण' करण्यात येत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

ही निविदा केवळ ऑपरेशन आणि देखभाल आराखड्यांतर्गत संबंधित सुविधांचे व्यावसायिक संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news