Goa IFFI Call Me Queen Social Stigma Film-'कॉल मी क्वीन' सामाजिक वास्तव मांडणारा चित्रपट

समाजात असलेला कलंक, रुग्णांच्या संघर्षाचे चित्रपटात ठळक चित्रण
Goa IFFI Call Me Queen
Goa IFFI Call Me Queen
Published on: 
Updated on: 

पणजी : भूषण आरोसकर

जर्मनीत जन्मलेल्या फ्रेंच-इराणी चित्रपट दिग्दर्शिका एमिली अतेफ दिग्दर्शित 'कॉल मी क्वीन' हा केनिया आणि अन्य देशांच्या सहनिर्मितीतून साकारलेला चित्रपट आहे. १९९०च्या दशकातील केनियातील एड्स आजाराची साथ, त्याविषयी समाजात असलेला कलंक आणि रुग्णांच्या संघर्षाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

इफ्फीच्या इंडियन प्रीमिअरमध्ये कॉल मी क्वीन या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. नैरोबीतील कोरोगोचो झोपडपट्टीतील पत्र्यांच्या घरांचे वास्तवदर्शी चित्रण करीत चित्रपटाची सुरुवात होते. त्यानंतर राणी ही व्यक्तिरेखा समोर येते. एलियान उमुहिर यांनी ही भूमिका साकारली आहे. राणी मूळची रवांडाची असून नैरोबीमध्ये राहते. तिची अॅना (डेनिस गॉफ) या परदेशी महिलेबरोबर अनपेक्षित मैत्री होते. दोघींच्या स्वभावातील हट्टीपणा आणि आयुष्यातील दुःखद अनुभव त्यांना एकमेकींच्या जवळ आणतात.

राणीला एड्स झाल्याचे निदान होते. या आजारामुळे तिचे उत्साही व्यक्तिमत्त्व खचते. अशा परिस्थितीत अॅना तिच्या मदतीला धावून येते. स्वतःच्या सामाजिक स्थानाचा आणि विशेषाधिकारांचा वापर करून ती राणीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करते. पुढे १९९०च्या दशकात सरकार आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून झालेल्या दुर्लक्षाविरोधात आफ्रिकेतील एड्सग्रस्तांसाठी ती लढा उभारते.

चित्रपटाचे नाव 'कॉल मी क्वीन' असले तरी पहिल्या भागात राणीपेक्षा अॅनाच्या संघर्षाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे राणीला समाजाकडून मिळणारी वागणूक, एकाकीपणा आणि आजाराशी तिचा वैयक्तिक संघर्ष पुरेशा प्रभावीपणे समोर येत नाही. मात्र, पुढे एड्सविषयीच्या सामाजिक कलंकाविरोधात राणीने उभारलेला लढा चित्रपटाला वेग देतो. शहरातील व्यावसायिक भागांमध्ये होणारी आंदोलने आणि त्या काळातील प्रत्यक्ष घटनांची संग्रहित दृश्ये चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूला वास्तवाची जोड देतात. एड्सच्या साथीचे सामाजिक वास्तव आणि त्याविरोधातील संघर्ष मांडण्यात चित्रपट यशस्वी ठरतो.

Goa IFFI Call Me Queen
Goa Manoj Parab vs Viresh Borkar RGP Rift |'वीरेश बोरकर यांना घडवले, राजकीय अंतही मीच करणार'

कलाकारांचा अभिनय प्रभावी...

चित्रपटातील कलाकारांचा प्रभावी अभिनय ही जमेची बाजू आहे. डेनिस गॉफ, डॉमिनिक वेस्ट आणि एलियान उमुहिर यांनी व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या आहेत. १९९०च्या दशकातील केनियाचे वातावरण, दृश्यरचना आणि नेपथ्य यांचीही काळजीपूर्वक मांडणी केली आहे.

Goa IFFI Call Me Queen
Goa Shirgaon Mining Economic Environmental Loss|खाणकामामुळे शिरगावला अर्थकारणाचा फटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.