Calangute Cricket Betting Goa | कळंगुटमध्ये क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

Calangute Cricket Betting Goa | बागा रेसिडेन्सी हॉटेलवर छापा; 19 जणांना अटक, एक कोटीचा ऐवज जप्त
Calangute Cricket Betting Goa
Calangute Cricket Betting Goa
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

कळंगुट पोलिसांनी खोब्रावाडो येथील बागा रेसिडेन्सी हॉटेलवर सोमवारी (दि.२९) मध्यरात्री छापा टाकून ऑनलाईन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत १९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन, १२ लॅपटॉप, संगणक आणि अन्य साहित्य असा सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Calangute Cricket Betting Goa
Sangli Crime : रोहित फाळके खूनप्रकरणी फरार संशयितास अटक

पोलिसांना हॉटेलमधून ऑनलाईन क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून मध्यरात्री धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन सट्टेबाजीसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.

पोलिसांकडून जप्त साहित्याची तपासणी सुरू असून, सट्टेबाजीतील आर्थिक व्यवहार, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार तसेच इतर राज्यांशी असलेले संभाव्य संबंध याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणी मोहम्मद शेख (वय ४९, अंधेरी), अमीन इरफान मन्सुरी (वय ३०, मुंब्रा), फैजल बच्छाव (वय ३०, मीरा रोड), हैदर अन्सारी (वय ३६, विरार), रहमत हुसेन खान (वय ५१, रत्नागिरी), शौकत मोहम्मद शेख (वय ३७, सायन),

Calangute Cricket Betting Goa
Nashik Bafna Jewellers | सराफ व्यावसायिक नीलेश बाफणा याला अटक

नईम शेख (वय ४०, अंधेरी), संकेत मायावंशी (वय २६, पालघर), विपिन केशर अलवर (वय ३१, अंधेरी), शिवप्रसाद नायर (वय २५, ठाणे), यश बाबू नायडू (वय २४, चेंबूर), राहुल भीमसिंह (वय २५, चेंबूर), यश मनोहर शिंगारे (वय २८, डोंबिवली), सचिन विजय वारंग (वय २४, डोंबिवली), असलम खान (वय ३२, मीरा रोड), अमीर ओरिफ हुसेन (वय २५, मध्य प्रदेश), सचिन मुन्नालाल वर्मा (वय २४, सांताक्रूझ) आणि मुजीफ शेख (वय ३७, मीरा रोड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८(४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात अमेरिकन नागरिकांना कर्ज, गिफ्ट कार्ड, क्रिप्टोकरन्सी तसेच अन्य माध्यमांतून फसविल्याच्या काही तक्रारींच्या अनुषंगाने या कारवाईला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news