Goa Judges Transfer | गोव्यातील न्यायव्यवस्थेत मोठे फेरबदल! राज्यातील 19 न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी

Goa Judges Transfer | मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; गोव्यातील ७ जिल्हा न्यायाधीशांसह १९ जणांच्या बदल्या
Goa Judges Transfer
Goa Judges TransferPudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आदेशानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार आणि मुख्य न्यायाधीशांच्या राज्यातील १९ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ७ जिल्हा न्यायाधीश, ६ वरिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश आणि ६ कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीशांचा समावेश आहे.

Goa Judges Transfer
Viresh Borkar Hunger Strike | पणजीत आज सर्वपक्षीय महाआंदोलन

आदेशानुसार, संबंधित न्यायाधीशांना ८ जून २०२६ रोजी नवीन जागी रुजू होण्यास सांगितले आहे. याबाबतचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महानिबंधक स्वप्निल खाती यांनी जारी केला आहे. जारी करण्यात आदेशानुसार, सात जिल्हा न्यायाधीशांची बदली होणार होती. मात्र; त्यांना त्याच्या पूर्वीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

यात जिल्हा न्यायाधीश द्विज्पल पाटकर, दुर्गा मडकईकर, शर्मिला पाटील, विजयालक्ष्मी शिवोलकर, अपूर्वा नागवेकर, शिल्पा पंडित आणि रैना फर्नांडिस यांचा समावेश आहे. वरिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश शाहीर इस्सानी आणि शानूर उर्फ जगदीश ऑडी यांचा मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात प्रस्तावित बदलीचा आदेश जारी केला आहे.

Goa Judges Transfer
Harmal Gram Sabha Goa | हरमलमध्ये स्पा आणि मसाज पार्लरवर कायमची बंदी! अनैतिक प्रकारांमुळे ग्रामसभेत संतापाचा उद्रेक

न्या. सुनीता गावणेकर यांचा म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. आश्विनी खांडोळकर यांचा मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात तर न्या. मनीषा पारकर उर्फ नार्वेकर आणि न्या. ज्यूड सिक्वेरा यांचा वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात प्रस्तावित बदलीचा आदेश जारी केला आहे.

कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीश पूर्वा नाईक यांचा वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. पूजा देसाई यांचा सत्तरी प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. अंकिता नागवेकर यांचा फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. क्विन्सी डिसिल्वा, स्मिता सैल यांचा पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात तर न्या. शबनम नागवेकर यांचा काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news