Viresh Borkar Hunger Strike | पणजीत आज सर्वपक्षीय महाआंदोलन

Viresh Borkar Hunger Strike | कलम 39 (अ) रद्द करण्यासाठी विरोधक एकवटणार
Viresh Borkar Hunger Strike
Viresh Borkar Hunger Strike
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

टीसीपीचे कलम ३९ (अ) रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. २३ रोजी) दुपारी ४ वाजता पणजीतील आझाद मैदानावर सर्वपक्षीय महाआंदोलन होणार असल्याची घोषणा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी केली. त्यामुळे पाळे - शिरदोणमधील भूरूपांतरण विरोधातील आंदोलन होणार अधिक तीव्र होणार असून आमदार विरेश बोरकर यांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे.

Viresh Borkar Hunger Strike
Harmal Gram Sabha Goa | हरमलमध्ये स्पा आणि मसाज पार्लरवर कायमची बंदी! अनैतिक प्रकारांमुळे ग्रामसभेत संतापाचा उद्रेक

दरम्यान, गोवा वाचवणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने आपण गोवा विकला जाऊ देणार नाही. जोपर्यंत नगर नियोजन खात्याचे कलम ३९- अ रद्द होत नाही आणि पाळे-शिरदोणमधील भूरूपांतरण रद्द केले. केले जात नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असे आमदार विरेश बोरकर यांनी आज पुन्हा स्पष्ट पणजीतील आझाद मैदानावर शनिवारपासून आमदार बोरकर यांच्यासह पाळे शिरदोण येथील तुषार गावस आणि श्याम गावस यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली.

शनिवारी त्यांनी आझाद मैदानात सकाळी दहा वाजता येण्याच्या त्याशिवाय विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली, त्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब, डॉ. ऑस्कर रिबेलो, मनीषा उसगावकर, तृणमूल काँग्रेसचे नेते मारिनो रॉड्रिग्ज यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मते मांडत भाजप सरकारवर टीका केली.

आमदार बोरकर यांना चुकीच्या पद्धतीने टीसीपी कार्यालयातून बाहेर काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; अन्यथा जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला. आरजीचे प्रमुख मनोज परब म्हणाले की, आमदार विरेश बोरकर गोव्याचे बुलंद आवाज ठरले आहेत.

आमदार बोरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड या पक्षांचे आमदार उभे आहेत. सरकारविरोधातील हे ऐक्य निवडणुकीतही टिकवून ठेवा. काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा आणि विजय सरदेसाई यांनी आघाडीबाबत सकारात्मक भूमिका मांडली, तर मनोज परब आणि आम आदमीचे वेन्झी व्हिएगस यांनी विरोधकांच्या आघाडीचा निर्धार केला.

Viresh Borkar Hunger Strike
Government School Challenges |अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मिळो मुक्ती...

भजन, घोषणांनी मैदान दणाणले

गावकऱ्यांनी आंदोलनस्थळी वेगवेगळ्या घोषणा दिल्या, ढोल ताशाच्या जोडीने गाणी म्हटली. बहुतेक घोषणा व गाण्यांतून सरकार आणि संबंधित मंत्र्यांवर टीका करण्यात येत होती. तर आमदार बोरकर यांच्या गोवा वाचवण्यासाठीच्या पुढाकाराबद्दल कौतुक करण्यात येत होते. गावकऱ्यांच्या घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून गेला होता.

'३९ ए' रद्द होणार नाही: फळदेसाई

नगर नियोजन खात्याचा ३९ ए कलम रद्द होणार नाही. ते योग्यच कलम आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्याची जी मागणी केली केली जात आहे, त्याला आपला पाठिंबा नाही, असे स्पष्टीकरण नगर नियोजन मंडळाचे सदस्य असलेले आमदार राजेश फळदेसाई केले. आझाद मैदानावर सांत अद्रिचे आमदार विरेश बोरकर यांनी ३९ ए रद्द करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा नाही, तो त्यांच्या मतदारसंघाचा विषय आहे, असेही फळदेसाई म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news