Goa Politics 2026 | काँग्रेसकडून लोकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
पणजी : पुढारी वृत्तसेवा
दाबोळी बंद होणार, अशा अफवा पसरून गेली अनेक वर्षे काँग्रेस लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. काँग्रेसचे खासदार बिरियतो फनाँडिस यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे.
हा दक्षिण गोव्यातील लोकांच्या भावनांशी खेळ असून लोकांत भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केली आहे. पणजी येथील भाजप कार्यालयात तिरुवनंतपुरम येथून आलेल्या भाजपच्या नगरसेवकाचा सत्कार दाम् नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी नाईक बोलत होते.
आरोग्य व नगरविकास खात्याचे मंत्री विश्वजित राणे, महापौर रोहित मोन्सेरात आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, दाचोळी बंद होणार नाही हे वारंवार केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट केलेले असतानाही काँग्रेसचे खासदार आपल्याकडे गुप्त माहिती असल्याचे सांगतात, त्यांनी ती माहिती जाहीर करावी, नाहीतर आपण अफवा पसरवली हे मान्य करावे, असे नाईक म्हणाले.
तिरुअनंतपुरमच्या नगरसेवकांचे स्वागत.... केरळमध्ये पहिल्यांदाच तिरुअनंतपुरम महापालिकेवर सत्ता प्राप्त केलेले भाजपचे नगरसेवक गोव्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आलेले आहेत.
मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमदार प्रवीण आर्लेकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कार्बोटकर आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे नगरसेवक पणजी येथील भाजप कार्यालयात दाखल झाले.
विरोधकांकडून गोव्याची बदनामी : खासदार सदानंद तानावडे
म्हापसा पुढारी वृत्तसेवा दाबोळीचा विमानतळ कदापी बंद होणे शक्य नाही. दाबोळी विमानतळ व मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन्हीही कायम कार्यरत राहणार आहेत. विरोधी पक्षातील नेते निवडणुका तोंडावर आल्यामुळे राजकीय फायदा उठवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या अशा खोट्या बातम्यांमुळे गोव्याचीच एक प्रकारे बदनामी होत असून त्याचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खासदार सदानंद शेटतानावडे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी उत्तर गोवा भाजपा सचिवरूपेश कामत उपस्थित होते. ते म्हणाले, दाबोळी विमानतळाबद्दल काँग्रेसचे नेते कॉन्फिडन्सल रिपोर्ट मिळाल्याचे सांगत आहेत, जर तसे असेल तर त्यांनी तो उघड करावा. गोळ्याची बदनामी होणारी वक्तव्ये करू नयेत, राजकीय वक्तव्य करण्यास काही हरकत नाही.
काँग्रेस २०२७ मध्ये गोव्यात सत्तेत येण्याची केवळ स्वप्ने पाहत आहेत. हे मुंगेरीलाल के हसीन सपने कधीच पूर्ण होणार नाहीत असा टोला तानावडे यांनी यावेळी लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण एकूण ३९ प्रश्न विचारले होते. वेगवेगळ्या २६ मंत्रालयात मार्फत आपणास त्याची योग्य उत्तरे मिळाली.
या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताची उभारणी करणारे स्ट्रॉग बजेट सादर केले. या अर्थसंकल्प मुळे भारताला योग्य दिशा मिळणार आहे. सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प असल्याने सर्वांसाठी फायदेशीर ठरणारा असा हा अर्थसंकल्प आहे, असे खासदार सदानंद शेटतानवडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

