

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. धुळेर येथील काउंटो होंडा शोरूम नजीक ’हिट अँड रन’ चा प्रकार घडला. भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक कारसह पळून गेला. (Goa Accident)
घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचेही काम सुरू असून त्याचा मृतदेह म्हापसा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. (Goa Accident)