नागपूर, गोवा विमानसेवा आता आठवड्यातून चारच दिवस

विमानसेवेतील कपात : विमाने छत्रपती संभाजीनगरला वळवली
नागपूर, गोवा विमानसेवा आता आठवड्यातून चारच दिवस
Published on
Updated on

नाशिक : नाशिकच्या विमानसेवेतील अस्थिरता संपता संपत नसल्याचे चित्र आहे. गेल्या १ मे पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केल्यानंतर, येत्या १० सप्टेंबरपासून बेंगळुरू विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नाशिककरांसाठी ही सुखद वार्ता असली तरी, नागपूर व गोवा विमानसेवेतील कपात निराशाजनक ठरली आहे. होय, ओझर विमानतळावरून दररोज सुरू असलेली नागपूर, गोवा विमानसेवा आता आठवड्यातून चारच दिवस उपलब्ध राहणार आहे. नाशिकची ही विमाने छत्रपती संभाजीनगरला वळविण्यात आली आहेत.

ओझर विमानतळावरून सध्या 'इंडिगो'ची विमानसेवा सुरू असून, नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या ठिकाणांसाठी सेवा दिली जात आहे. बऱ्याच कालावधीनंतर नाशिकची विमानसेवा सुरळीत सुरू असताना, तिचे पंख छाटण्याचे प्रकार अधूनमधून होत असतात. तीन महिन्यांपूर्वी नाशिक येथून अहमदाबादसाठी दररोज दोन विमाने उपलब्ध होती. मात्र, त्यापैकी एक विमान एप्रिलपासून रद्द करण्यात आले. उरलेले विमानही दर बुधवारी उपलब्ध नसते. याशिवाय इंदूरसाठीही दररोज उपलब्ध असलेली सेवा तीन दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आली. त्यामुळे इंदूरचे विमान आता मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशीच उपलब्ध असते. ही कपात झाल्यावर उद्योग व पर्यटन क्षेत्राने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता नागपूर व गोवा या दोन्ही सेवांवर गंडांतर आले आहे. यापुढे या दोन्ही शहरांसाठी मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी विमानसेवा बंद राहणार आहे. सोमवार (दि. २)पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

नागपूर, गोवा विमानसेवा आता आठवड्यातून चारच दिवस
नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

राजकारण्यांचे अपयश

नाशिक येथून कपात करण्यात आलेली विमानसेवा छत्रपती संभाजीनगरला वळवण्यात आली आहे. तेथे सोमवार (दि. २)पासून दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी नागपूर व गोव्यासाठी विमाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सकाळी ११.३० वाजता गोव्याला जाण्यासाठी, तर दुपारी २.१० वाजता गोव्याहून येण्यासाठी, सायंकाळी ४.४० वाजता नागपूरला जाण्यासाठी, तर रात्री ९.४० वाजता नागपूरहून येण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. दरम्यान, विमानसेवेत केलेली कपात राजकारण्यांचे अपयश असल्याची चर्चा आता उद्योग वर्तुळात रंगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news