

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी नववर्षानिमित्त बायणा किनाऱ्यावर ३१ डिसेंबर रोजी रात्री आयोजित कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून आनंद लुटला. गेल्या कित्येक वर्षात असा प्रतिसाद कोणत्याही कार्यक्रमाला लाभला नव्हता.
हजारो नागरिकांची उपस्थिती हा एक विक्रमच होता. आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह नगरसेविका श्रध्दा आमोणकर यांन सदर कार्यक्रमाचे योग्यरित्या नियोजन केले होते. गेले काही दिवस या नियोजनासंबंधी चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. पण यंदा मिळालेला प्रतिसाद अद्भूतपूर्व होता. विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.