Goa illegal gas storage news | अवैध गॅस सिलिंडर साठवणूक प्रकरणी कारवाई

सुकूरमध्ये पंचायतीसह नागरी पुरवठा खात्याकडून दखल
LPG Cylinder Price
LPG Cylinder Price
Published on
Updated on

पर्वरी : पर्वरी-सुकूर येथील एका निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक होत असल्याबाबत तेथील रहिवासी महेश गावस यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत स्थानिक सुकूर पंचायत व नागरी पुरवठा खात्याने तातडीने तपास करून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

सदर प्रकरणी नागरी पुरवठा कार्यालय बार्देश येथील पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पथकात नागरी पुरवठा बार्देश तालुक्याचे निरीक्षक राजीव आर. सावंत यांच्या नेतृत्वाखाली, उपनिरीक्षक रोहित तळणकर आणि उपनिरीक्षक सर्वेश एस. नाईक तुयेकर यांनी कारवाई केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने रहिवासी बजरंग शर्मा (मूळ राजस्थान) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सरपंच पेडणेकर यांचे कौतुक

निवासी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित आणि जबाबदारीने हस्तक्षेप करून संभाव्य धोका टाळल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी बार्देश तालुका नागरी पुरवठा खात्याचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे व सुकूर पंचायत सरपंच सोनिया पेडणेकर यांचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news