आषाढी एकादशी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठल रखुमाई मंदिरात केली महापूजा

आषाढी एकादशी निमित्‍त गोवेकरांसह देशवासियांना दिल्‍या शुभेच्छा
Ashadhi Ekadashi: Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant performed Mahapuja at Vitthal Rakhumai temple
आषाढी एकादशी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठल रखुमाई मंदिरात केली महापूजाPudhari Photo
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी एकादशीनिमित्त अन्साभाट, विठ्ठलवाडी, म्हापसा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाची अभिषेक व महापूजा केली.

Ashadhi Ekadashi: Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant performed Mahapuja at Vitthal Rakhumai temple
आंबोली घाटमार्गात मोठा दगड कोसळला

यावेळी त्यांनी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण गोवेकरांना आणि भारतीयांना शुभेच्छा दिल्या. भारत सध्या संस्कृतीच्या दिशेने वाटचाल करीत असून, सुसंस्कृत भारत व सुसंस्कृत गोवा घडत आहे. गोव्यातील बऱ्याचशा भाविकांनी पंढरपुरात जाऊन चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले आहे. त्यांची वारी सफल झाली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Ashadhi Ekadashi: Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant performed Mahapuja at Vitthal Rakhumai temple
पणजी : मडगावात घर कोसळून युवकाचा मृत्‍यू

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष तुषार टोपले यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शाल, श्रीफळ व देवस्थानची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आषाढी एकादशी निमित्त विविध वेशभूषा केलेल्या बालगोपाळात रमून गेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news