पणजी : मडगावात घर कोसळून युवकाचा मृत्‍यू

पणजी : मडगावात घर कोसळून १८ वर्षीय युवकाचा मृत्‍यू, वडील जखमी
Panaji: Death of youth due to house collapse in Margaon
पणजी : मडगावात घर कोसळून युवकाचा मृत्‍यू Pudhari Photo

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

पावसाने सर्वत्र हाहाकार मजवलेला असतांना सासष्टी तालुक्याच्या मडगावात घर कोसळून एक अठरा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याचे वडील गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलममध्ये दाखल करण्यात आले आहे.

Panaji: Death of youth due to house collapse in Margaon
गाेवा राज्यात धुवाधार पावसाने जबरदस्त तडाखा

मृत युवकाचे नाव कार्तिक चव्हाण असे असून वडिलांचे दुर्विजय असे नाव आहे. ही घटना पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान तळसाझर येथे घडली. सर्व कुटुंब साखर झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे त्यांना सावरत आले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news