Anjuna Communidade | कोमुनिदाद जागेत फेकला पंचतारांकित हॉटेलचा कचरा, भंगार साहित्य

माझलवाडा येथील डोंगरमाथ्यावर कचऱ्याचे ढीग; अज्ञातांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी
कचरा
Pudhari
Published on
Updated on

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

अज्ञातांकडून एका तारांकीत हॉटेलचा कचरा व भंगार साहित्य कोमुनीदादच्या मालकीच्या जागेत उघड्यावर टाकला जात असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार हणजूण कोमुनीदादने हणजूण पोलिस स्थानकात व हणजूण कायसुव पंचायतीत केली आहे.

कचरा
Vasco Cyber Fraud | बँक अधिकारी असल्याचे भासवून 2.30 लाख उकळले

माझलवाडा येथील कोमुनीदादच्या मालकीच्या सर्वे क्र. २५५/१ या डोंगर माथ्यावरील जागेत वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा व टाकाऊ भंगार साहित्य टाकण्यात आले आहे.

या भंगार साहित्यात वागातोर येथील एका तारांकित हॉटेलचा ट्रेडमार्क असून त्यांच्याकडून किंवा त्यांनी सोपवलेल्या कंत्राटदाराकडून हे साहित्य टाकण्यात आले असावे, अशी माहिती कोमुनीदादचे अॅटर्नी सेबी डिसोझा यांनी सांगितले.

कचरा
Subhash Velingkar Ponda | मराठीपुढे पोतुगीजांनीही पत्करली होती शरणागती

कोमुनिदादच्या जागेचा कोणीही गैरवापर करू नये. अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

पोलिसांनी तसेच पंचायतीने यावर कठोर कारवाई करावी. पंचायतीतर्फे कचरा उचलण्याची योजना सुरू असतानाही कचरा टाकणे हा गुन्हा असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news