Goa | कुडचडेच्या राजकारणात नवा रंग

अमित पाटकर यांच्या पुनरागमनाने मतदारसंघातील समीकरणे बदलणार
Curchorem politics
Curchorem politics
Published on
Updated on

Amit Patkar Return Changes Political Equations in Curchorem

मडगाव : कुडचडे मतदारसंघातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या सक्रिय पुनरागमनामुळे येथील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार निलेश काब्राल आणि पक्षाशी संबंधित युवा चेहरा रोहन गावस देसाई यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच पाटकर यांच्या मतदारसंघातील पुनरागमनामुळे कुडचडेच्या राजकारणाला नवा रंग येण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर पाटकर यांना त्या पदावरून मुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जागी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदा-यांमुळे मतदारसंघाकडे अपेक्षित लक्ष देता आले नाही, असे सांगत आता कुडचडे मतदारसंघावर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.

कुडचडे मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून विद्यमान आमदार निलेश काब्राल आणि रोहन गावस देसाई हे दोघेही आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याची चढाओढ सुरू असून, अलीकडील झालेल्या स्पर्धावरील मोठ्या खर्चाचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.

Curchorem politics
Ramanand Sampradaya Goa | रामानंद संप्रदायातून राज्यात पहिले मरणोत्तर देहदान

कुडचडे मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अमित पाटकर यांचा सुमारे ७०० मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पाटकर यांनी स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर टीका केली. खराब रस्ते, अपुरी आरोग्यसेवा आणि अपूर्ण पायाभूत सुविधा यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. कुडचडेतील आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांना उपचारासाठी मडगावला जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. अशा परिस्थितीत अमित पाटकर यांच्या पुनरागमनामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळते का आणि भाजपमधील अंतर्गत स्पर्धेचा त्यांना कितपत फायदा होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले.

Curchorem politics
Opposition to Casinos in Goa - गोव्यात कॅसिनोला वाढता विरोध

केंद्रीय नेतृत्वाशी लवकरच चर्चा...

"काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. गोव्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसारच मी पुढील काम करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news