अमित शहा यांची म्हापशात उद्या सभा

अमित शहा यांची म्हापशात उद्या सभा

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. शुक्रवारी, 3 मे रोजी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानासमोरील नव्या बसस्थानकावरील जागेत सायंकाळी 5 वाजता होणार शहा यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

म्हापसा येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खवंटे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्ळकर उपस्थित होते. ते म्हणाले, भाजपच्या दोन्ही मतदारसंघांत प्रचाराच्या दोन फेर्‍या पूर्ण झालेल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या प्रचारात प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. शहा यांच्या सभेला 15 हजारांहून जास्त लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे, असेही तानावडे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news