AAP Leader Deepak Singla | 'आप'ला मोठा धक्का! बँक फसवणूक प्रकरणात गोवा प्रभारी दीपक सिंगला यांना 'ईडी'कडून अटक

AAP Leader Deepak Singla | बँक फसवणूक आणि मनी लाँडरिंगशी संबंधित एका प्रकरणात 'ईडी'च्या पथकाने दिल्ली आणि गोव्यात दोनापावला येथे छापे टाकले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि गोव्याचे प्रभारी दीपक सिंगला यांना अटक केली.
AAP Leader Deepak Singla | 'आप'ला मोठा धक्का! बँक फसवणूक प्रकरणात गोवा प्रभारी दीपक सिंगला यांना 'ईडी'कडून अटक
Published on
Updated on

नवी दिल्ली / पणजी : पुढारी वृत्तसेवा

बँक फसवणूक आणि मनी लाँडरिंगशी संबंधित एका प्रकरणात 'ईडी'च्या पथकाने दिल्ली आणि गोव्यात दोनापावला येथे छापे टाकले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि गोव्याचे प्रभारी दीपक सिंगला यांना अटक केली. 'ईडी'च्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात बँकिंगमधील अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली.

AAP Leader Deepak Singla | 'आप'ला मोठा धक्का! बँक फसवणूक प्रकरणात गोवा प्रभारी दीपक सिंगला यांना 'ईडी'कडून अटक
Navi Mumbai logistics park: नवी मुंबईत 925 एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर

बँक फसवणूक आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. सिंगला यांच्याव्यतिरिक्त, 'ईडी'ने दिल्लीतील सुभाषनगर भागातील बाबाजी फायनान्स ग्रुपशी संबंधित असलेल्या राम सिंग यांच्या कार्यालयावरही छापा टाकला. तपास यंत्रणेच्या मते, बाबाजी फायनान्स ग्रुपवर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या कंपनीने लोक किडन कोट्यवधी रुपये गोळा केले आणि नंतर हे पैसे विविध ठिकाणी हस्तांतरित केले. या पैशांचा वापर कसा आणि कुठे झाला, याचा तपास आता 'ईडी' करत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात मनी लाँडरिंग आणि आर्थिक अनियमिततेच्या विविध पैलूंचा तपास केला जात आहे. तपास यंत्रणेने छाप्यांदरम्यान अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली.

AAP Leader Deepak Singla | 'आप'ला मोठा धक्का! बँक फसवणूक प्रकरणात गोवा प्रभारी दीपक सिंगला यांना 'ईडी'कडून अटक
Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपत रस्सीखेच

आप'चा सरकारवर निशाणा

दिल्ली आणि गोव्यातील आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध 'ईडी'ने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'आप'ने केंद्र सरकार आणि भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मते, विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय हालचालींना रोखण्यासाठी 'ईडी', सीबीआय आणि इतर यंत्रणांचा वापर केला जात आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी आरोप केला आहे की, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये 'ईडी' आणि सीबीआयचा 'शस्त्र' म्हणून वापर केला, त्याचप्रमाणे आता पंजाब आणि गोव्यात राजकीय दबाव आणण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जात आहे. गोव्यात आम आदमी पक्षाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि म्हणूनच भाजपने आपला 'निष्ठावान एजंट' म्हणजेच 'ईडी'ला तिथे पाठवले आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईवरून भाजपवर समाजमाध्यमांवर टीका केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news