Navi Mumbai logistics park: नवी मुंबईत 925 एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर

चिरले गावाजवळ 174 एकरांवर होणार विस्तार
Navi Mumbai logistics park
Navi Mumbai logistics parkPudhari
Published on
Updated on

उरण: मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतूक, व्यापार आणि गोदामांच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी सिडकोने एक पाऊल पुढे टाकले आहे. सिडकोमार्फत नवी मुंबईतील पुष्पक नोड आणि चिरले गावाजवळ तब्बल 925 एकर जागेवर एक भव्य एकात्मिक लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे.

या महाकाय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सिडकोने कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव म्हणजेच निविदा मागवल्या आहेत. ई-कॉमर्स, उत्पादन क्षेत्र आणि बंदराशी संबंधित व्यापारामुळे सध्या आधुनिक गोदामांची मागणी प्रचंड वाढली असून, ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

Navi Mumbai logistics park
Janjira Fort Closed from 26 May: मुरुडचा जंजिरा किल्ला 26 मे पासून बंद राहणार; सुट्टीच्या शेवटच्या रविवारी किल्ल्यावर होणार गर्दी

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सिडको चिरले गावाजवळील सुमारे 174 एकर जमिनीवरील 12 भूखंड 60 वर्षांच्या लीजवर देणार आहे. या जमिनीचा मूळ आधारभूत दर 24,711 रुपये प्रति चौरस मीटर निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार एका एकरची किंमत साधारण 10 कोटी रुपये होते.

सिडको आपल्या पास-थ्रू पॉलिसी अंतर्गत एक-टप्पा ई-टेंडर आणि त्यानंतर ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकपणे या भूखंडांचे वाटप करणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाला असून सिडकोने याचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे. निवडल्या गेलेल्या विकासकाला या ठिकाणी आधुनिक गोदामे, माल एकत्रिकरण, पॅकेजिंग, सॉर्टिंग आणि कस्टम-बॉन्डेड वेअरहाउसिंग यांसारख्या सुविधा उभ्या कराव्या लागतील.

Navi Mumbai logistics park
Marathi Signboard: मराठी पाट्यांसाठी महापालिका आक्रमक; 60 निरीक्षकांच्या फौजेसह मुंबईत व्यापक मोहीम राबवणार

या प्रकल्पाच्या मोक्याच्या स्थानामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या गुंतवणूकदार कंपन्यांनी यात मोठी उत्सुकता दाखवली आहे. सिडकोने आयोजित केलेल्या निविदापूर्व बैठकीला ब्लॅकस्टोन समूहाचे होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स, वेल्सपन, ईएसआर, डीपी वर्ल्ड, हिरानंदानी ग्रुपचे ग्रीनबेस लॉजिस्टिक, कशमन अँड वेकफिल्ड आणि टीव्हीएस लॉजिस्टिक यांसारख्या जागतिक दर्जाच्या दिग्गज कंपन्यांनी हजेरी लावली.

या बड्या कंपन्यांच्या सहभागावरून मुंबई-नवी मुंबई-रायगड परिसरात आधुनिक गोदामांसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठी चुरस असल्याचे स्पष्ट होत आहे. या भव्य प्रकल्पामुळे आगामी काळात या भागात उद्योगधंद्यांसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news