पणजी: इस्रोने चंद्रायान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरवून ते कार्यान्वित केले. हा भारताच्या तांत्रिक शक्तीचा विजय आहे. भविष्यात माणसाला चंद्रावर उतरवण्याचे इस्रोचे ध्येय असल्याचे प्रतिपादन इस्रोचे अध्यक्ष व राष्ट्रीय अवकाश विज्ञान समितीचे अध्यक्ष सोमनाथ एस. यांनी आज (दि.२६) केले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोवा विद्यापीठ आणि भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या सहकार्याने आयोजित ४ दिवशीय अवकाश विज्ञान व संशोधन परिषदेत सोमनाथ बोलत होते. परिषदेचे उद्घाटन राज्यपाल पी. एस. श्रीधर पिल्लई यांनी केले. Somnath. S
'वैज्ञानिक आणि शोध मोहीम: भारतातील विज्ञान समुदायासाठी संधी', या विषयावर बोलताना सोमनाथ म्हणाले की, चंद्रायान 3 च्या यशस्वी कामगिरीनंतर माणसाला चंद्रावर उतरविण्याचे इस्रोचे ध्येय आहे. त्यादृष्टीने कामही सुरू झाले आहे. ज्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आहे, त्या ग्रहाच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांचा प्रकार आणि ही सामाजिक रेषा देखील निवडलेली आहे. आपण ग्रहांचे निरीक्षण करून त्या अतिरिक्त सौरग्रहांच्या वातावरणातून जाणार्या प्रकाशाद्वारे एखाद्या भौतिक गोलाकडे हा विशिष्ट संबोधन करतो, तेव्हा आपण सक्षम व्हायला हवे. Somnath. S
मिशनने पृथ्वीपासून ब्लॅक ग्रॅज्युएट पॉईंटपर्यंतचे 15 दशलक्ष कि. मी. अंतर दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य केले आहे. उपग्रहातील उरलेल्या इंधनासोबतच उपग्रहाच्या आरोग्याच्या प्रकाराबाबत पुढील 45 वर्षांत घडणार्या निरीक्षणाचा आपण शोध घेत आहोत. आम्ही चंद्रावरून वंडर टेक ऑफ करून पृथ्वीवर परत येऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आता आल्याचे ते म्हणाले. Somnath. S
पृथ्वीवर, आकाशात घडणार्या घटनांचे कुतूहल जाणून घेण्याची ज्यांची इच्छा असते, तेच लोक संशोधक होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासून पृथ्वीवरील व आकाशातील घटनांकडे लक्षपूर्वक पहावे. विज्ञानावर प्रेम करावे. अंतराळाचा शोध सुरू करावा. विविध प्रयोग करत राहावे. शिक्षण घेत असतानाच संशोधक व्हावे, असे प्रतिपादन सोमनाथ यांनी केले.
हेही वाचा