Lok sabha election 2024 | गोव्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस लढवणार, ‘आप’चा पाठिंबा

Lok sabha election 2024
Lok sabha election 2024

पणजी : गोव्यात विरोधकांची इंडिया आघाडी होईल का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, गोव्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस लढवणार असून आम आदमी पक्ष कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे. दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांच्या झालेल्या बेठकीत दिल्लीतील जागावाटप केल्यानंतर गोव्यात प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व आपचे गोवा संयोजक ॲड अमित पालेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस लढवणार असल्याची घोषणा केली. (Lok sabha election 2024)

Lok sabha election 2024 : भाजप, कॉंग्रेस,आरजी अशी तिरंगी लढत शक्य

आपने यापूर्वी दक्षिण गोव्यातून आमदार वेन्सी वियेगस यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता आपला उमेदवार मागे घेणार आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिस्को सार्दीन यांना डावलून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news