मडगाव : जुन्या हॉस्पिसियो दवाखान्याचा कोसळला सज्जा | पुढारी

मडगाव : जुन्या हॉस्पिसियो दवाखान्याचा कोसळला सज्जा

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : मडगावातील जुन्या बांधकामाच्या धोक्याकडे प्रशासनाचे अजूनही लक्ष गेलेले नाही. मडगाव नागरी आरोग्य केंद्र कोसळण्याचा घटना ताजी असताना वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या हॉस्पिसियो दवाखान्याचा सज्जा कोसळण्याचा प्रकार गुरुवारी (दि. २५) रोजी घडला.

संबंधित बातम्या 

हॉस्पिसियो दवाखाना नवीन जिल्हा दवाखानाच्या इमारतीत करण्यात आल्याने, ही इमारत ओस पडली होती. तिचे जतन होण्यापूर्वीच सज्जा कोसळून पडल्याने सरकारचा वेळकाढूपणा याला कारणीभूत ठरला जात आहे.

कोविड काळानंतर जुन्या हॉस्पिसियोमधील सर्व वैद्यकीय कामकाज नवीन जिल्हा दवाखान्यात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, यावर्षी पावसात सुमारे सहा महिन्यांपूर्वी मडगाव नागरी आरोग्य केंद्राचा एक भाग कोसळल्याने, ही इमारत दुरुस्त होईपर्यंत जुन्या हॉस्पिसियो दवाखान्यात स्थलांतरित करण्यात आली होती. येथे दर दिवशी शेकडो रुग्ण तपासासाठी येत असतात. मात्र, जुन्या हॉस्पिसियोच्या इमारतीचा सज्जा कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोर्तुगीज कालीन ही इमारत जतन करावी अशी मागणी आमदार विजय सरदेसाई व सर्व स्थानिकांकडून मागणी जोर धरत होती. परंतु, जुन्या हॉस्पिसियो इमारतीचे बांधकाम तसेच पडून राहिल्याने सदर इमारत कमकुवत झाली आहे.

Back to top button