Chinmay Murder Case :सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ

Chinmay Murder Case :सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ


पणजी : स्वत:च्या मुलाच्या खूनाचा आरोप असलेल्या सूचना सेठला बाल न्यायालयाने आज (दि.१५) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सूचना सेठला म्हापसा न्यायालयाने दिलेली सहा दिवसांची कोठडी रविवारी (दि.१४) संपली होती. आता १९ जानेवारीला पुन्हा कोर्टात तिला हजर करण्यात येणार आहे.

हे प्रकरण बालकाच्या मृत्यूशी निगडीत असल्याने कळंगुट पोलिसांनी तिला सोमवारी पणजीतील बाल न्यायालयात हजर केले.
यावेळी न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सूचना सेठ पोलिस चौकशीला सहकार्य करत नाही. तिचा पती व्यंकटरामण य‍ांची डीएनए चाचणी करायची आहे. याशिवाय इतर पुरावेही गोळा करायचे आहेत. त्यामुळे सूचनाला पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सूचनाचा पती व्यंकटरामण य‍ांची आज सोमवारी गोमेकॉत डीएनए चाचणी होणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news