Bengaluru CEO kills son : गोव्यात ४ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या महिलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी

Bengaluru CEO kills son : गोव्यात ४ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या महिलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : बेंगळूरु येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओने ४ वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घटनेतील आरोपी महिलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकेरी-कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये स्वत:च्या चार वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून पसार झालेल्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे. सूचना शेठ असे या ३९ वर्षीय उच्चशिक्षित महिलेचे नाव आहे. पोलीस अधीक्षक निधीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ ही महिला ६ जानेवारी रोजी गोव्यात आली होती. द. गोव्यातील कळंगुट येथील हॉटेलमध्ये राहिली. सोमवारी (दि. ८) या महिलेने बेंगळूरु येथे जाण्यासाठी टॅक्सी मागवली. सामान टॅक्सीत घालून ती निघून गेली.

ही निघून गेल्यानंतर रुमची साफसफाई करतांना कर्मचाऱ्याला रक्त आढळून आले. कळंगुट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या घटनेचा अधिक तपास सुरु केला. या तपासात सेठ हिच्या टॅक्सीतील सामान तपासले असता मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी सुचना शेठ हीला अटक केली व मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. कळंगुट पोलिसांनी सुचना सेठ हिला गोव्यात आणले.

पोलिसांनी विचारपूस केली. यावेळी पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पतीवरील रागातून सुचना हिने मुलाला मारले असावे असा संशय निधीन वालसन यांनी व्यक्त केला. सुचना ही मुळ प. बंगालची असून केरळच्या व्यक्तीशी लग्न झाले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संशयित आरोपी महिला ही बंगळूरस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप 'माइंडफुल' या कंपनीची संस्थापिका आणि सीइओ आहे. विविध कंपन्यांना आयटी सोल्यूशन्स पूरवण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. २०२१ साली सूचना सेठला '१०० ब्रीलियंट वूमन इन एआय एथीक्स लिस्ट २०२१' चा सन्मान देखील मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news