गोव्यात मंत्री, आमदारांकडून मंदिरांची स्‍वच्छता; पंतप्रधानांनी केले होते आवाहन | पुढारी

गोव्यात मंत्री, आमदारांकडून मंदिरांची स्‍वच्छता; पंतप्रधानांनी केले होते आवाहन

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा २२ जानेवारी रोजी अयोध्येला होणाऱ्या श्रीराम मंदिर उदघाटन व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबाबत आवाहान केले होते. त्‍याला प्रतिसाद देत गोव्यातील मंत्री आणि आमदारांनी विविध मंदिरात स्‍चच्छता केली.

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या मतदारसंघातील वाळपई येथील श्री हनुमान मंदिरात स्‍वच्छता केली. पर्यटन मंत्री रोहण खंवटे यांनी पर्वरी येथील मंदिरात स्‍वच्छता केली. आमदार डॉ. देवीया राणे यांनी पर्ये येथील श्री भुमिका मंदिरात साफसफाई केली. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ईतर मंत्री व भाजप आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मंदिरात स्‍वच्छता करून अभियानात सहभाग घेतला.

हेही वाचा : 

Back to top button