गोवा : धर्मांतरण प्रकरणी चर्चच्या कथित धर्मगुरूंना अटक | पुढारी

गोवा : धर्मांतरण प्रकरणी चर्चच्या कथित धर्मगुरूंना अटक

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : सडये, शिओली येथील फाईव्ह पिलर चर्चचे कथित धर्मगुरू (पास्टर) आणि स्वयंघोषीत गॉडमॅन डॉमिनिक डिसोजा याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा तिसऱ्यांदा अटक केली आहे. धर्मांतरण आणि ब्लॅक मॅजिक प्रकरणी पोलिसांकडून आज (दि.१) पहाटे अटक करण्यात आली.

फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या मूळ तामिळनाडूच्या ४० वर्षीय इसमाने डॉमिनिक डिसोजा व त्याची पत्नी जोहान मास्करेनास यांच्याविरुद्ध धर्मांतरण करण्याची तक्रार म्हापसा पोलिसात दिली होती. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध तसेच चर्चशी संबंधित सर्व अज्ञातांविरुद्ध भादंसं 153 अ, 295 अ, 506 (2), 34 कलमाअंतर्गत तसेच ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीअस कायदा 1954 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. याच कलमांतर्गत याच्या विरुद्ध हा तिसरा गुन्हा नोंद असून आणखी पाच कलमांतर्गत गुन्हे या अगोदरच नोंद करण्यात आलेले आहेत. वादग्रस्त अशा या डॉमिनिक डिसोजा विरुद्ध एकूण ८ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा :

Back to top button