पणजी : नेसाई औद्योगिक वसाहतीमधील ममता ट्रेडर्स सुपर मार्केटिंग युनीटला भीषण आग

file photo
file photo

मडगाव; पुढारी वृत्तसेवा राज्यात आगीच्या दुर्घटनां दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कुडचडेत सिलिंडर स्फोटाची घटना ताजी असतांना काल (सोमवार) मध्यरात्री नेसाई औद्योगिक वासाहतीतील ममता ट्रेंडर्स सुपर मार्केटिंग युनीटच्या अस्थापनाला लागून असलेले संपूर्ण युनिटला आग लागली. यामध्ये हे संपूर्ण युनिट जळून खाक झाले. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना समोर आली.

आग लागल्याची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाला या विषयी कळवण्यात आले. वेळेत मदतकार्य न मिळाल्याने सुमारे दिड तास आग तशीच धुमसत होती. अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सौजा यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेदहा वाजता आग लागल्याची माहिती मिळाळी. यानंतर लगेच अग्निशामक यंत्रणा सक्रिय करण्यात आली. आगीच्या व्याप्तीची माहिती मिळवून पाण्याचे बंब नेसाय येथे पाठवण्यात आले. संपूर्ण युनिट मध्ये आग पसरली होती. ती विझवण्यासाठी बाहेरून पाण्याची फवारणी करण्यात आली.

पॅकेजिंगचे साहित्य बॉक्स मध्ये पॅक करण्यात आले होते. सर्व बॉक्स एकावर एक अशा पध्दतीने ठेवण्यात आले होते. त्यांना लागलेली आग विझवण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. मडगावातून आणखी स्टाफ मागवण्यात आला. तसेच कुडचडे आणि कुंकळी इथून पाण्याचे बंब मागवण्यात आले. आग विझवण्यासाठी पाण्याचे एकुण चार बंब लागल्याची माहिती गिल सौजा यांनी दिली. आग कशी लागली याची चौकशी सध्या सुरू असून, या दुर्घटनेट संपूर्ण युनीट आगीत भस्मसात झाल्यामूळे नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. पंचनामा केल्यानंतर सविस्तर नुकसानीचा आकडा कळणार आहे असेही ते म्हणाले.

गेल्या महिनाभरात आगीच्या घटनांनी डजनभराचा आकडा पार केला आहे. यापूर्वी उत्तर आणि दक्षिण गोव्यात सिलिंडर स्फोटाच्या तीन घटना घडल्या असून, वास्कोत दोघा महिलांचे बळीही गेलेले आहेत. ऑगस्ट महिन्यात नुवे येथील एका महिलेचा होरपळून मृत्यूही झाला होता. हुंडा बळीशी निगडीत असलेल्या या घटनेत सासूच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश सासष्टीच्या न्यायदंडाधिकाऱ्यानी दिले आहेत.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news