Goa News: गिरी-म्हापसा येथे कारचा भीषण अपघात; चालक ठार | पुढारी

Goa News: गिरी-म्हापसा येथे कारचा भीषण अपघात; चालक ठार

पणजी : पुढारी वृत्तसेवा : पर्वरी येथून म्हापशाच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कारला गिरी-म्हापसा येथे भीषण अपघात झाला. या कारने महामार्गावरील दुभाजकावर जात माडाला जोरदार धडक दिल्याने माड रस्त्यावर कोसळला. तर कारचे दोन तुकडे झाले. यात कारचालक जुआँव डिसोझा (वय 78) यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.29) दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास झाला. Goa News

जुआँव यांची कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या माडावर इतकी जोरात आदळली की, दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. जुआँव हे आज दुपारी जीए-01 आर-8563 या क्रमांकाच्या कारने पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने जात होते. सांगोल्डा जंक्शन काढून काही अंतरावर पोहोचताच कार राष्ट्रीय महामार्गावर मधोमध असलेल्या माडावर आदळली. ही धडक इतकी जबर होती की कारच्या दर्शनी भागात अर्धा माड घुसला होता. हा माडही मोडून पडला आहे. Goa News

अपघातानंतर जुआँव कारमध्येच अडकून पडले होते. महामार्गावरील वाहनचालकांनी घटनास्थळी धात दरवाजा मोडून काढत त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत डिसोझा यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पर्वरी पोलिसांनी पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button