भाचीसाठी सलमान खान रेड कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष

पणजी : इफ्फीच्या रेड कार्पेटवर आज (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजता अभिनेता सलमान खान अवतरला. आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट ’फर्रे’ हा इफ्फीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
दिग्दर्शक सौमेंद्र पाधी फर्रेचे दिग्दर्शक असून अभिषेक यादव आणि पाधी यांनी संवाद लेखन केले आहे. यात अलिजेहची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटासाठी आणि अलिजेहचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सलमान रेड कार्पेटवर दाखल झाला.
हेही वाचा