iffi : इफ्फीच्या उद्घाटनाचे ‘सल्लू भाई’ला निमंत्रण | पुढारी

iffi : इफ्फीच्या उद्घाटनाचे ‘सल्लू भाई’ला निमंत्रण

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटनास प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सलमान खान यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासह हॉलीवूड चित्रपट कलाकार मायकल डग्लस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष तथा आमदार डिलायला लोबो यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

इफ्फीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी निविदा काढून ती कामेही सुरू आहेत. विविध चित्रपटगृहे ठरलेली आहेत. पणजीतील आयनॉक्स, सम्राट अशी थिएटर्सची नोंदणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इफ्फीच्या उद्घाटनासाठी सलमान खान यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अद्याप त्यांनी निमंत्रण स्वीकारले नसले तरी ते उद्घाटनाला उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा आहे, अशी माहिती लोबो यांनी दिली. पणजीसह इतर 3 ठिकाणी खुल्या जागेत इफ्फीच्या काही चित्रपटांचे प्रदर्शन लोकांसाठी केले जाणार आहे. अशी माहितीही लोबो यांनी यावेळी दिली.

Back to top button