Goa Child Trafficking | गोव्यातून गायब झालेल्या 58 टक्के मुलांचा पत्ताच नाही! केंद्रीय गृहमंत्रालयाची संसदेत धक्कादायक माहिती

Goa Child Trafficking | मानवी तस्करी प्रकरणी 88 जणांना अटक ; केवळ चौघांना शिक्षा
Child assault case
Child assault casePudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २५६ मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यापैकी १५० मुलांचा अद्याप शोध लागलेला नसून, ५८ टक्के मुले बेपत्ता असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

Child assault case
₹1.75 Crore Liquor Seized | गोवा बनावटीची १.७५ कोटीची दारू जप्त

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये गोव्यात ५२ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी २२ मुलांचा शोध लागला, तर ३० मुले अद्याप बेपत्ता आहेत. २०२१ मध्ये ४३ मुले बेपत्ता झाली; १४ मुलांचा शोध लागला आणि २९ जणांचा शोध लागला नाही.

२०२२ मध्ये ५५ मुले बेपत्ता झाली, त्यापैकी २३ मुलांचा शोध लागला तर ३२ मुले अद्याप बेपत्ता आहेत. २०२३ मध्ये बेपत्ता झालेल्या ४८ मुलांपैकी १७ मुलांचा शोध लागला असून ३१ मुले अद्याप सापडलेली नाहीत. २०२४ मध्ये ५८ मुले बेपत्ता झाली; त्यापैकी ३० मुलांचा शोध लागला, तर २८ मुले अद्याप बेपत्ता आहेत.

Child assault case
Vande Mataram : गोवा काँग्रेस अधिवेशनात फक्त अर्धे ‘वंदे मातरम्’, मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित, भाजपची टीका

2020 मध्ये 27 जणांना अटक

या तीन वर्षांच्या कालावधीत गोव्यात मानवी तस्करीच्या प्रकरणांमध्ये ८८ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या पाच वर्षांत केवळ चार आरोपी दोषी ठरले आहेत. २०२० मध्ये मानवी तस्करीप्रकरणी २७ जणांना अटक झाली होती. २०२१ मध्ये २६, २०२२ मध्ये २२, २०२३ मध्ये ११ आणि २०२४ मध्ये २ जणांना अटक केली. या प्रकरणांमध्ये २०२२ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी दोन आरोपी दोषी ठरल्याची माहिती देण्यात आली.

महत्त्वाचे मुद्दे

  • एकूण बेपत्ता मुले (२०२०-२०२४): २५६ पैकी १५० मुले (५८%) अद्याप बेपत्ता.

  • मानवी तस्करी कारवाया: ८८ जणांना अटक, पण केवळ ४ आरोपींना शिक्षा (दोषी सिद्ध).

  • वार्षिक बेपत्ता मुले :

    • २०२०: ५२ (३० बेपत्ता)

    • २०२१: ४३ (२९ बेपत्ता)

    • २०२२: ५५ (३२ बेपत्ता)

    • २०२३: ४८ (३१ बेपत्ता)

    • २०२४: ५८ (२८ बेपत्ता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news