₹1.75 Crore Liquor Seized | गोवा बनावटीची १.७५ कोटीची दारू जप्त

जयसिंगपूरजवळ सापळा; हरियाणातील चालकाला अटक
 (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर : ट्रकमधील एक कोटी ७५ लाखांचा दारूसाठा हस्तगत करणारे पोलिस पथक.
Published on
Updated on

कोल्हापूर : जयसिंगपूरजवळ गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एक कोटी ७५ लाख ६८ हजार रुपयांचा दारूसाठा आणि २० लाखांचा ट्रक जप्त केला. चालक मुसकान ऊर्फ जावेद खान (२८, रा. हरियाणा) याला अटक करण्यात आली आहे. चौकशीतून दारू तस्करीचे मध्य प्रदेश कनेक्शन उघड होण्‍याची शक्यता आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा लावला होता.

या कारवाईत १८६० दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. जावेदखान याच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत हवालदार उत्तम सडोलीकर, राम कोळी, अरविंद पाटील सहभागी झाले होते. दारू तस्करीची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news