विविध दाखल्यांच्या शुल्क दरांत होणार वाढ; मडगाव पालिका बैठकीत निर्णय | पुढारी

विविध दाखल्यांच्या शुल्क दरांत होणार वाढ; मडगाव पालिका बैठकीत निर्णय

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  आधीच महागाई त्यात दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती मडगाव पालिकेने जनतेची करून टाकली आहे. विविध सेवा करामध्ये भरभक्कम वाढ करताना आता चरित्राच्या दाखल्यासाठी सुद्धा जनतेला 500 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शुक्रवारी पार पडलेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत पालिकेने विविध दाखल्याच्या शुल्क वाढीवर प्रस्ताव मांडला.

नागरिकांना विश्वासात न घेता, पालिकेने काही महिन्यांपूर्वीच घर कर, कचरा कर व अन्य करात प्रचंड वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांना वाढीव शुल्क भरावे लागत असून त्यात शुक्रवारच्या बैठकीत पालिका सभागृह शुल्क 500 रुपये होते. ते आता 1000 रुपये केले आहे. परदेशात जाणार्‍यांना चरित्राचा दाखल प्राप्त करण्याची असते. त्यासाठी हे काम करताना पाच ते सहा जणांना त्या व्यक्तीचे सर्व दस्तऐवज पडताळून पाहावे लागतात. त्यासाठी पालिका पूर्वी काहीही शुल्क घेत नव्हती. मात्र आता चरित्राचा दाखला प्राप्त करण्यासाठी 500 रुपये, आकारण्यात येणार असल्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच उत्पन्न दाखल 50 रुपये पासून 100 रुपये, रहिवासी दाखला 50 रुपायांवरून 100 रुपये, यांसारखे अनेक दाखले प्राप्त करण्यासाठी शुल्क वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका मंडळाच्या बैठकीत मंडळ आहे.

जन्म व मृत्यू दाखल प्राप्त करण्यासाठी 50 रुपये शुल्क आहे. मात्र 100 रुपये करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, नगरसेवकांनी जन्म व मृत्यू दाखलीचा शुल्क वाढवू नये. पूर्वी प्रमाणेच ठेवाव असे सांगितले. मात्र अन्य शुल्कात वाढ झाल्याने या वाढीव शुल्कामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला जबर फटका बसणार आहे.

अनेक वर्षांपासून शुल्क दरात वाढ झालेली नाही. त्यासाठी आपण शुल्क दर वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडला असल्याचे नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी सांगितले. नव्याने करण्यास काहीही हरकत नाही मात्र करण्यात येणारी शुल्क वाढ कायदेशीर पणे व्हावी, असे सांगून शुल्क वाढीच्या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.

Back to top button