गोव्यात दारूचे दुकान फोडले; कोल्हापूर येथील दोघांना अटक | पुढारी

गोव्यात दारूचे दुकान फोडले; कोल्हापूर येथील दोघांना अटक

पर्वरी; पुढारी वृत्तसेवा :  गोव्याजवळच्या मालीम, बेती येथील दारूचे दुकान फोडून चोरी करणार्‍या दोघांना पर्वरी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि. 3 ते 4 जून दरम्यान रात्री मालीम बेती येथील राज वाईन स्टोअरचे शटर तोडून सुमारे 22 हजार किमतीच्या विविध बनावटीच्या मद्याच्या बाटल्या चोरून नेल्याची तक्रार मालक चिराग नाईक यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही आणि सर्व्हेलन्सच्या साहाय्याने कोल्हापूर येथील गांधीनगरमधून दोघांना ताब्यात घेतले. संशयितांची नावे समीर बाबू नदाफ (27) आणि मुस्तकीम इनामदार(22) अशी असून चोरी करताना त्यांनी पांढर्‍या रंगाच्या कारचा वापर केला होता. आरोपीना चार दिवसांचा रिमांड मिळाला आहे.

उत्तर गोवा अधीक्षक निधीन वालसन, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक, प्रतीक भट प्रभू, प्रमुख हवालदार सुभाष गावस यांनी शोध मोहिमेत भाग घेतला होता.

Back to top button