गोवा : चिंबल येथे एकाचा खून, ४ जणांना अटक | पुढारी

गोवा : चिंबल येथे एकाचा खून, ४ जणांना अटक

पणजी : पुढारी वृत्तसेवा : जुने गोवे पोलीस स्थानक परिसरातील चिंबल येथे काल बुधवारी (दि. ३१ मे) रोजी मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. बल्लू उर्फ मुरगन मंजुनाथ गवंडर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री बल्लू उर्फ मुरगन मंजुनाथ गवंडर व लिंगनाथ पालयेकर यांच्यामध्ये काही कारणांमुळे जोरदार भांडण झाले. त्यावेळी लिंगनाथ पालयेकर याने आपल्या इतर सहकार्‍यांसोबत बल्लू गवंडर याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

जुने गोवे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्वरीत ते घटनास्थळावर दाखल झाले. यानंतर घठनास्थळावरून लिंगराज पालयेकर याच्यासह प्रतिक्षा उर्फ निलीमा परशुराम गवंडर, हेमंत पालयेकर व परशुराम गवंडर या चार संशयिताना अटक केली. संशयिताची कसून पोलिस चौकशी करत आहेत.

हेमंत पालयेकर हा साखळी चोर्ला मार्गे गोव्याबाहेर पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. बल्लू गवंडर याचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पुढील तापासासाठी पाठविण्यात आला आहे. जुने गोवे पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button