आगामी विधानसभा पेडणेतूनच लढवणार : बाबू आजगावकर | पुढारी

आगामी विधानसभा पेडणेतूनच लढवणार : बाबू आजगावकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  पक्षाकडून उमेदवारी मिळू दे अथवा न मिळू दे, आपण आगामी विधानसभा निवडणूक पेडणे मतदारसंघातूनच लढवणार, असा पुनरुच्चार माजी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी केला आहे. येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगो कार्यक्रमाला माजी आनावरण क्रीडामंत्री आजगावकर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पेडणे ही आपली कर्मभूमी आहे. आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे आपली लोकप्रियता आणि काम करण्याची पद्धत सर्वसामान्य पेडणेवासीयांना माहीत आहे. २०२७ ची निवडणूक आपण याच मतदारसंघातून लढवणार आहे. उमेदवारी मिळो किंवा न मिळो; परंतु आपण निवडणुकीच्या रिंगणात असेल. आपली उमेदवारी ही पेडणीची जनता ठरवणार असल्याचाही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धा राज्यात व्हावी, त्यासाठी क्रीडामंत्री असताना साधन सुविधा, नवे इनडोअर स्टेडियम पेडणेमध्येही उभारले. परंतु कोरोनाच्या काळात या राष्ट्रीय स्पर्धाना मुहूर्त मिळाला नाही. आता क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याने आपल्याला आनंद होत आहे

 

Back to top button