मडगाव : पारोडाच्या सिद्धनाथ पर्वताच्या जंगलात भीषण आग | पुढारी

मडगाव : पारोडाच्या सिद्धनाथ पर्वताच्या जंगलात भीषण आग

मडगाव; पुढारी वृत्तसेवा दक्षिण आणि उत्तर गोव्यातील राखीव वनक्षेत्राच्या जंगलात पेटलेला वणवा शांत होतो न होतो तोच आता काणकोणच्या चापोली धरण परिसर आणि केपेतील पारोडाच्या सिद्धनाथ पर्वताच्या जंगलाला आग लागण्याची घटना समोर आली आहे. पारोडात गेल्या तीन दिवसांपासून या आगीचा वणवा पेटला होता, पण सोमवारी, रात्री उशिरा लोकवस्ती जवळ आग पोचल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुंकळीचे आमदार आणि विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी रात्री उशिरा पारोडा येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आग लावण्यामागे माफियांचा हात असुन, आगीच्या या घटनांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेल्या उच्चस्‍तरिय समितीद्वारे केली जावी अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. ही आग विझवण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

या विषयीच्या सविस्तर माहिती नुसार, शुक्रवार पासून पारोड्याच्या जंगलात आग धुमसत होती. स्थानिक लोकांनी त्या घटनेची माहिती वन खत्याला दिली होती. वन खात्याने आपले कर्मचारी पाठवून घटनेच्या सद्यस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली होती. पण आग विझवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. सोमवारी रात्री ती आग पारोड्याच्या लोकवस्तीपर्यत पोहोची होती. प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना राबवून आग आटोक्यात आणावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button