Paneer schezwan Maggi : सुट्टीत मुलांसाठी खास पद्धतीनं बनवा पनीर शेजवान मॅगी | पुढारी

Paneer schezwan Maggi : सुट्टीत मुलांसाठी खास पद्धतीनं बनवा पनीर शेजवान मॅगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकिकडे कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत तर दुसरीकडे लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्या असल्याने मुलांसोबत कुटूंबिय वेगवेगळे ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखत आहेत. दरम्यान स्वयंपाक घरातील मुलांची लुडबूडही वाढली आहे. फिरायला जाण्याचा आणि नवनविन खावू खाण्यासाठी नेहमीच मुले आग्रह करत असतात. मग कधी आईस्क्रिम तर कधी पाणीपुरीवर ताव मारला जातो. यातील एक प्रकार म्हणजे, मुलांना आवडणारी मॅगी. मॅगी म्हटलं की, हमखास मुलांच्या तोडाला पाणी सुटतं. अशा वेळी जर घरीच्या घरी चविष्ट पनीर शेजवान मॅगी बनवली तर. चला पाहूयात रेसीपी…( Paneer schezwan Maggi )

साहित्य-

मॅगी – छोटे दोन पॅकेट
पनीर – अर्धा पावशेर
बारीक चिरलेला कांदा- अर्धी वाटी
भिजलेले हिरवे वटाणे- अर्धी वाटी
लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची- प्रत्येकी अर्धी वाटी
बारिक चिरलेले गाजर- अर्धी वाटी
बारिक चिरलेले टोमॅटो- अर्धी वाटी
बारिक चिरलेला कोबीज- अर्धी वाटी
मीठ- चवीनुसार
शेजवान चटणी- दोन चमचे
लाल तिखट- छोटा १ चमचा
हळद- अर्धा चमचा
धने पावडर- अर्धा चमचा
पाणी- आवश्यकतेनुसार
तेल- छोटे दोन चमचे

Schezwan Maggi (Foodies Corner) - ParcelWalaa

कृती-

१. पहिल्यांदा एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालून ते उकळत ठेवावे.

२. पाणी उकळ्यानंतर त्यात मॅगी आणि मॅगी मसाला घालून हलवावे आणि ते २ मिनिटांपर्यत झिजवावे.

३. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल घालून ते गरम करावे. यानंतर यात बारिक चिरलेले कांदा, हिरवे वटाणे, सिमला मिर्ची, गाजर, टोमॅटो आणि बारिक चिरलेला कोबीज घालून परतून घ्यावे.

४. दोन मिनिटांनंतर यात चवीपुरते मीठ, दोन चमचे शेजवान चटणी, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि छोटे केलेले पनीरचे तुकडे घालून परतवून घ्यावे.

५. पनीर चांगले मिक्स झाल्यावर यात पहिल्या पॅनमधील तयार केलेली मॅगी मिसळावी.

६. यानंतर एक वाटी पाणी घालून हे मिश्रण दोन मिनिटांपर्यत झाकण ठेवून चांगले झिजवावे.

७, यानंतर एका प्लेटमध्ये तयार झालेली पनीर शेजवान मॅगी मुलांना खायला द्यावी. ( Paneer schezwan Maggi )

हेही वाचा : 

Back to top button