गोवा : साळावली धरणाच्या पाणी पातळीत दोन मीटरने घट | पुढारी

गोवा : साळावली धरणाच्या पाणी पातळीत दोन मीटरने घट

मडगाव : रविना कुरतरकर : साळावली धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या 26 दिवसांत या धरणातील पाणीसाठा दोन मीटरने कमी झाला आहे. 2 मार्चला 36.45 मीटर पाणीसाठा नोंद झाला होता, तो 28 मार्च रोजी 34.56 मीटर इतका झाला आहे.

जलस्रोत विभागाचे सहायक अभियंता जेसन मिरांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, साळावलीत केवळ 47 टक्के पाणी शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन होण्यास अजून साधारण दीड ते दोन महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत हे पाणी जपून वापरावे लागणार आहे. दर दिवशी कृषीसह ओपा येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी 11.5 क्यूबिक मीटर प्रति सेकंद याप्रमाणे साळावली धरणातून काले नदीत पाणी सोडले जाते.

त्याव्यतिरिक्त जायकाच्या प्रकल्पालाही पाणीपुरवठा केला जातो. साळावली धरणाचे काम 1972 मध्ये सुरू करण्यात आले होते, ते 1978 पूर्ण झाले. मात्र, कालव्यांचे बांधकाम व अन्य कारणांमुळे 2007 साली हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले.

Back to top button