गोवा : पणजी-वास्को जलमार्गाचा स्थानिकांना फायदा | पुढारी

गोवा : पणजी-वास्को जलमार्गाचा स्थानिकांना फायदा

पणजी : पुढारी वृत्तसेवा : पणजी आणि वास्को या शहरांना जोडणारा राष्ट्रीय जलमार्ग 68 तयार झाल्याने स्थनिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. मोदी यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या ट्विटला उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली.

श्रीपाद नाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पूर्वी पणजी ते वास्को हा प्रवास सुमारे 32 कि.मी.चा होता. यासाठी 45 मिनिटांचा अवधी लागत होता. राष्ट्रीय जलमार्गामुळे हे अंतर 9 कि.मी. ने कमी झाले आहे. त्यासाठी आता केवळ 20 मिनिटांचा कालावधी लागतो. ते म्हणतात, मांडवी नदी ही गोव्याची जीवनरेखा आहे. येथे दळण वळणासाठी जेटी बांधणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी आवश्यक सीआरझेड आणि पर्यावर मंजुरी मिळणे सहज नव्हते.

पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीने तरंगत्या जेटीची संकल्पना पुढे आली. यानंतर ‘पीएम गतिशक्ती’ योजनेद्वारे मांडवी नदीत तरंगती जेटी बांधण्यात आली.

Back to top button